Ad will apear here
Next
जि. प. डोहोळेपाडा शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा


भिवंडी :
ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील कोशिंबी केंद्रातील डोहोळेपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक म्हसकर होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला म्हसकर, डोहोळे ग्रामपंचायत सदस्या मंजुळा वाघे, मंजुळा फापे, मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला. डॉ. कलाम यांच्या जीवनकार्यावर सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी प्रबोधन केले. उपस्थित मान्यवरांनी, शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी शाळेत उपलब्ध असलेली विविध महापुरुषांची, शास्त्रज्ञांची, कथांची पुस्तके एक तास वाचली.

१५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिनही होता. त्या निमित्तानेही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात हात साबणाने धुवायची सवय लागावी व आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रबोधन करण्यात आले.

आभारप्रदर्शन मुख्याध्यापक जगदीश जाधव यांनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZVWCF
Similar Posts
बोरिवलीच्या समतानगरमधील जिल्हा परिषद मराठी शाळेत वाचन प्रेरणा दिन भिवंडी : भिवंडी तालुक्याच्या पडघा केंद्रातील समतानगर, बोरिवली येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत १५ ऑक्टोबर २०१९ रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
भिवंडीत फटाकेमुक्त दिवाळी अभियानाला सुरुवात भिवंडी : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे भिवंडीतील शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा प्रधान सचिव गणेश शेलार यांनी भिवंडीतील रांजणोली, शिवनगर, चौधरपाडा, सावाद, मुठवल, सरवली या जिल्हा परिषद
डोहोळे व डोहोळेपाडा शाळांना महामानवांच्या प्रतिमा भेट भिवंडी : तालुक्यातील डोहोळे येथे राहणारे युवा सामाजिक कार्यकर्ते शुद्धोधन अशोक जाधव यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मणार्थ कोशिंबी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा डोहोळे येथे संत गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा, तर जिल्हा परिषद शाळा डोहळेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब
कवाड जिल्हा परिषद शाळेत अंधश्रद्धेविषयी जनजागृती भिवंडी : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर २०१८ रोजी भिवंडी तालुक्यातील कवाड जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्वप्नील भोईर, अक्षय भोईर, करण कुंदेकर या तरुणांनी एकत्र येत या शाळेतील विद्यार्थ्यांना, तसेच शिक्षकांना ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वाटप केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language